जरांगे पाटलांच काही बरे-वाईट झाल तर होणारा उद्रेक सरकारला पेलणार नाही-अजय पाटील साळुंके -MH Bindass

0

शांताराम मगर -बिंदास 

 वैजापुर तालुक्यातील लोणीखुर्द येथे मराठा आरक्षणासाठी व मनोज जरांगे पाटील समर्थनार्थ रास्ता रोको.मुंडन आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला मराठा समाजाला न्यायालयात टिकेल असे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी प्रमाणे आरक्षण देण्यात यावे.मनोज जरांगे पाटील सात दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते.त्याची प्रकृती खालवल्यामुळे यावेळी परिसरातील या आंदोलनास पाठिंबा म्हणून परीसरातील नागरिकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत रास्ता रोको करण्यात आला यावेळेस पाच किलोमीटर पर्यंत वाहणाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.


 



मराठा आरक्षणासाठी Maratha बांधवांच मुंडन आंदोलन संतप्त होऊन केला रास्ता रोको...!

यावेळी बोलतांना अजय साळुंके म्हणाले मराठा आरक्षणासाठी  जीव गेला तरी बेहत्तर अता माघार नाही.मराठा आरक्षण चळवळ टिकवून आदोलनाची धग कायम ठेवा अशी भावनिक साद घालत अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतःवर  गोडी झाडून आपल्या प्राणाची आहुती  दिली. काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतली.यांच्यासह अनेकांनी बलिदान दिले आहेत.त्यांचे बलिदान व्यर्थ जावु देऊ नका , मराठा समाजाचा केवळ वापर मराठाच समाजातील नेत्यांनी केला शंड आणि स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजणाऱ्या नेत्यांमुळे मराठा समाजाची हि अवस्था झाली .जरांडे पाटलांच्या जीवाचे काही बरे- वाईट झाल्यास राज्यात राजकीय लोकांना रस्त्याने फिरणे अवघड होईल.

 समाज पेटून उठलेला असतांना शंड म्हणून थंड बसले नेते 

 समाज पेटून उठलेला असतांना शंड म्हणून थंड बसलेल्या राजकीय नेत्यांना समाज माफ करणार नाहीत. मतदानरुपी हत्यारातुन मराठा समाज यांची राजकीय हत्या केल्या शिवाय शांत बसणार नाहीत अशा आक्रमक शब्दात अजय पाटील यांनी संताप व्यक्त केला.यावेळी चंद्रशेखर सांळुके बोलतांना म्हणाले जरांगें पाटलांनी सांगितले आहे २० तारखेपर्यंत थांबा ,म्हणून सरकारनेच वेळीच निर्णय घेतला नाहि तर सरणावर बसुन अग्नि समाधी घेणार ... 



 भुजबळांनी केलेल्या त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

होणाऱ्या परिणामाला  सरकार जाबादार राहिल.आंदोलना दरम्यान मुंडन करतांना भुजबळांनी केलेल्या त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत आजित पवार, देवेंद्र फडणवीस हे दोघेही मराठा आरक्षण विषयांवर समोर येत नाहीत फक्त मुख्यमंञी एकनाथ शिंदे हेच एकमेव मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहेत असे नितीन निकम म्हणाले.. 



प्रसंगी अजय पाटील साळुंके.अर्चनाताई साळुंके ,प्रशांत सदाफळ,चंद्रशेखर साळुंके,सुनिल बोडखे, उत्तमराव निकम,डाॅ.अर्जुन साळुके,प्रमोद जिवरग, नितीन निकम,काशिनाथ कोकटे ,प्रशांत निकम,किशोर मगर,आमोल निकम,राजेंद्र जगदाळे,एनडीए निकम यांची भाषणे झाली.


चोख बंदोबस्त !


 मराठा आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनाची धार तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यावेळेस पोलीस पाटिल रावसाहेब सोमासे व शिऊर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला यावेळेस पंचक्रोशीतील मराठा. मुस्लीम ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top