शिवजयंती निमित्त वैजापूरात शिक्षक भारती संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर;शंभरावर रक्तदात्यांनी केले रक्तदान-MH Bindass

0


हिंदवी स्वराज्य संस्थापक  संपूर्ण महाराष्ट्राचे  दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सामाजिक बांधिलकी जपत येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखेच्या वतीने पंचायत समिती सभागृहात सोमवार(ता,१९) रोजी भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले, या रक्तदात्यांचे रक्त संकलन छत्रपती संभाजीनगर  येथील श्री दत्ताजी भाले रक्तपेढीने केले.



 या रक्तदान शिबिराचा आरंभ माजी नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी,डॉ,राजीव डोंगरे, पंकज ठोंबरे, शिक्षण विस्तार अधिकारी मनीष दिवेकर,माजी शिक्षणाधिकारी व  समाज कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत झाला ,,सर्व प्रथम हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास  मान्यवरांनी अभिवादन केले.



 शिक्षक भारतीचे  राज्याध्यक्ष किशोर कदम,जिल्हा सरचिटणीस मछिंद्र भराडे ,जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब हाडोळे,तालुका अध्यक्ष बाबासाहेब जगताप,प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय गायकवाड,सचिव अनिल जगदाळे, कोषाध्यक्ष अनिल नाईकवाडी, तालुका प्रसिद्धी प्रमुख विशाल तांबे,सल्लागार अण्णासाहेब जाधव यांनी सर्वांचे पुष्पहार व शाल देऊन स्वागत केले.


 धोंडीरामसिंह राजपूत यांनी या शिक्षक भारतीच्या उपक्रमाचे कौतुक करून शिक्षक भारती, सामाजिक बांधिलकी जपत असल्याबद्धल त्यांना धन्यवाद दिले,या प्रसंगी दत्ताजी भाले ब्लड बॅंकेचे आप्पासाहेब सोमासे, गजानन वाघ,अविनाश बडक,रेवती जोशी,वर्षा घुमरे यांनी रक्त संकलन केले,या समयी महाराष्ट्र पत्रकार संघ शाखा वैजापूर चे अध्यक्ष दीपक बरकसे यांनीही रक्तदान केले, या प्रसंगी नगर सेवक उल्हास पा,ठोंबरे, स्वप्नील जेजुरकर,पंकज ठोंबरे,ए, टी, पगारे व इ

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top