शिउरच्या सरपंच पदासाठी किरण झिंजुर्डे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज -MH Bindass

0

  राहुल आहेर -MH Bindass 

वैजापूर तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिऊर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी किरण विजय झिंजूर्डे यांची शुक्रवार दि.१६ फेब्रुवारी रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.किरण झिंजुर्डे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके वाजवून आपला आनंद साजरा केला.


 

शिऊर ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री काशिनाथ जाधव यांनी दोन महिन्यांपूर्वी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता.त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी शुक्रवारी  ग्रामपंचायत शिऊर कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.


सरपंच पदासाठी किरण झिंजुर्डे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज

 यावेळी सरपंच पदासाठी किरण झिंजुर्डे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा कोतकर यांनी किरण झिंजुर्डे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.यावेळी माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी, उपसरपंच उज्वला क्षीरसागर,लता आढाव,मंगल जाधव,कांचन देशमुख,सोनाली जाधव, ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील जाधव,माजी सरपंच अशोक जाधव, नवनाथ आढाव,अर्जुन क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर जाधव,सुनील शिरोडे,चांगदेव जाधव,रामेश्वर जाधव,सुनील खांडगौरे,गणेश मोरे उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top