ठाकरेंची डोकेदुखी वाढली ,खैरे म्हणतात मी दानवेंचा गुरु ,दानवे म्हणतात मी बाळासाहेबांचा शिष्य , MH Bindass

0

 

मी पक्षात खैरे म्हणून नाही तर उद्धवसाहेब म्हणून काम करतो ,खैरेनी मला नेहमीच डावलले आहे असा घणाघात करत पक्षप्रमुख यांच्याकडे हट्ट धरणे हे काही चुकीचे नाही , एक शिवसैनिक म्हणून माझा तो अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ! अशा पद्धतीचा खुलासा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे विधान परिषद विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असलेले अंबादास दादा दानवे यांनी माध्यमांसोबत बोलताना केला आहे. 


खैरे म्हणतात मी दानवेंचा गुरु, दानवे म्हणतात मी बाळासाहेबांचा शिष्य !

लोकसभेचा बिगुल वाजलेला असतानाच चंद्रकांत खैरे म्हणतात कि मी दानवेंचा गुरु आहे आणि ते माझे शिष्य आहेत आणि गुरु कधीच शेवटचा हातचा शिष्याला देत नाही असे बोलून खैरे यांनीही दानवे यांच्यावर निशाना साधला आहे. तर हम भी किसीसे काम नाही हे दानवे यांनी दाखवून दिले आहे ते म्हणाले मी फक्त बाळासाहेबांचा शिष्य बाकी दुसरा कोणताही व्यक्ती माझा गुरु नाही असे स्पष्टीकरण प्रसारमाध्यमांना दोघांनीही दिले आहे.आता तिकिटाचा धनी कोण यावरून राजकारण चांगलेच तापले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंबादास दानवे खरच प्रवेश करतील का ?

मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे कि ,विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दादा दानवे खरच प्रवेश करणार आहेत कि वावड्या यावर पूर्णविराम जरा मिळाला असला तरी उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे यांना छ.संभाजीनगरची लोकसभेची उमेदवारी देण्याचे जरी ठरविले असले तरी अंबादास दानवे यांनी लोकसभा तिकीटाची मागणी केली आहे.मागील पंचवार्षिकलाच अंबादास दानवे हे लोकसभा लढण्याच्या तयारीत होते.मात्र त्यावेळी सुद्धा त्यांना पक्षाने लोकसभा लढू दिली नाही.याउलट माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा प्रचार करण्याची नामुष्की दानवे यांच्यावर ओढवली.तेव्हापासून अंबादास दानवे हे नाराज होते. त्यामुळे यावेळी काहीही झाले तरी दानवे हे लोकसभा लढवतील असा कयास कार्यकर्त्यांनी काढला होता. आणि ठाकरेंनी तिकीट नाकारले तर पर्याय म्हणून एकनाथ शिंदेंची शिवसेना तयार होती ,आहे यात शंकाच नाही.



दानवे यांनी ठाकरेंची साथ सोडली तर उबाठा शिवसेनेला आजवरचा सर्वात मोठा धक्का 


विधान परिषदेच्या खुर्चीवर विराजमान झाल्यापासून अंबादास दानवे यांनी राज्यभर विविध प्रलंबित कामे मार्गी लाऊन जनमानसात आपली अप्रतिम प्रतिमा निर्माण करण्यात कुठलीही कसर ठेवलेली नाही .याउलट पक्षाने सुद्धा दानवे यांना तिकीट दिल्यास छ संभाजीनगरचा बालेकिल्ला अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकते असे जाणकारांचे मत आहे. दानवे शिंदे गटात जाणार या वावड्या उठायला लागल्या आणि दस्तुरखुद्द मातोश्रीवर हालचाली सुरु झाल्या.दानवे यांची मनधरणी सुरु झाली. पण जर खरच अंबादास दादा दानवे यांनी ठाकरेंची साथ सोडली तर मात्र ठाकरे यांच्यावर पश्चाताप करण्याची नामुष्की ओढवली जाऊ शकते यात शंकाच नाही.कारण पक्षापलीकडे काम करणारा मोठा चाहता वर्ग अंबादास दानवे यांच्या जवळ आहे. दानवेच नाही पक्षात तर कार्यकर्ते कशाला थांबणार असाही विषय चर्चेत आहे.


दानवे यांच्यामुळे पक्षाला बळकटी 


विधान परिषद विरोधी पक्षनेता म्हणून नाही तर अंबादास दादा दानवे यांनी कठीण काळातसुद्धा उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली नाही याची दखल दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनी वेळीच घ्यायला हवी. नाही तर पक्षात राहून हि अनेक डाव टाकले जातात हे काय नविन नाही. जर छ.संभाजीनगर लोकसभेसाठी अंबादास दानवे उमेदवार म्हणून नसतील तर मात्र हि जागा उबाठा गटाने गमावली म्हणून समजा कारण दानवे यांची गावखेड्यात मजबूत पकड असल्या कारणाने ते विजयो होऊ शकतात हे पक्षाला सुद्धा माहितेय. त्यामुळे अंबादास दादा दानवे यांच्या बाबतीत पक्षाने विचार करावा असे मत सर्व सामान्य शिवसैनिक करत आहेत.


खैरे ,दानवे  यांच्या तिकिटाच्या वादात ठाकरेंची कोंडी 


एकीकडे जिल्ह्यातील पाच आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला साथ दिली आणि ठाकरेंची साथ सोडली मात्र अशा कठीण परीस्थितसुद्धा अंबादास दानवे यांनी ठाकरेंची साथ सोडली नव्हती. आणि खैरे तर आधीपासूनच मातोश्रीचे निष्ठावान समजले जातात त्यात चार टर्म खासदारकी लढविलेले नेते त्यामुळे वरिष्ठ असून मुख्य बॉडीत असलेले खैरे लोकसभा लढवू इच्छिता तर दुसरीकडे दानवे यांनी कठीण काळात शिवसैनिकांना लढण्याची उर्जा निर्माण केली .पक्ष टिकविला.आपल्या शांतीत क्रांती करण्याचा दानवे यांच्या स्वभावाने विरोधक सुद्धा थंडावले असताना शिवसैनिक टिकून राहिला तो अंबादास दानवे यांच्या मुळेच त्यामुळे खैरेना तिकीट दिले तर दानवे नाराज आणि दानवे यांना  तिकीट दिले तर खैरे नाराज  मग तिकीट कुणाला द्यायचे हा यक्षप्रश्न ठाकरेंकडून सुटेल का ? हे पाहणे तितकेच औत्सुक्याचे ठरेल .




Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top