यावेळची छ संभाजीनगर लोकसभा निवडणूक मात्र चुरशीची होणार आहे .या निवडणुकीत पंचरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.रिंगणात बाशिंग बांधून तयार असलेल्यापैकी हे दिग्गज लोकसभेच्या मैदानात असतील.अंबादास दानवे ,खा इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे, डॉ.भागवत कराड , डॉ जीवन राजपूत, आणि विनोद पाटील यांची नावे सध्या चर्चेत आहेत.
नंबर १ वर चर्चेत आहेत अंबादास दानवे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील अनेक आमदारांनी साथ सोडल्यानंतर ठामपणे ठाकरे यांच्यासोबत छ संभाजीनगर ची मुलुख मैदानी तोफ खंबीर उभी होती. अंबादास दानवे यांच्या स्वरुपात विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेता पक्षाला मिळाला.यामुळे शिवसेना उबाठा यांच्या पक्षाला बळकटी मिळाली.सध्या ते लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त करत आहे.यातूनच अनेक वावड्यातिकीटाबद्दल उठल्या.खैरे विरुद्ध दानवे असा वाद जरी सुरु असला तरी सुद्धा दानवे यांना मातोश्री कडून ग्रीन सिग्नल मिळाल्याची चर्चा आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.
नंबर २ च्या क्रमांकावर आजही चर्चेत खा.इम्तियाज जलील
दोघात तिसरा असा डाव साधत मागील वेळी (AIMIM) या पक्षाकडून जलील यांनी उमेदवारी घेतली होती.मात्र या निवडणुकीत जात आणि धर्म हा अजेंडा जास्त चालल्याने हिंदूची मते विभागली गेली यातच हर्षवर्धन जाधव आणि ट्रक्टर मुळे अजून भर पडली आणि खैरे यांचा पराभव करत इम्तियाज जलील खासदार बनले. यावेळी सुद्धा अशीच काहीशी स्थिती होऊ शकते याचा फायदा जलील यांना होईल त्यामुळे ते लोकसभेच्या रिंगणात येऊ शकतात.
नंबर ३ च्या चर्चेत भाजपचे डॉ भागवत कराड
डॉ भागवत कराड यांना केंद्रातील मंत्रिपद मोदि सरकारने जाहीर केल्यानंतर कराड यांनी गावखेड्यापर्यंत आपला संपर्क वाढविला खरा परंतु कार्यकर्त्यामध्ये भर पडण्याचे काम करण्यात कराड अपयशी ठरले. यामुळे त्यांच्या विजयाबद्दलचा सर्वे टक्केवारीत कमी निघाला.याचाच अंदाज घेत महायुतीतील पाच आमदारांनी अदृश्यपणे कराड यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार कायम ठेवली आहे. पण अजूनही गेम पलटी होऊ शकते कारण भाजपाची खेळी हि भल्या-भल्यांना लक्षात येत नाही. त्यामुळे कराड हे सुद्धा महायुतीकडून उमेदवार म्हणून मैदानात येऊ शकतात.
नंबर ४ च्या चर्चेत आहेत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे
सलग चार वेळा लोकसभेवर भगवा फडकवीनारे शिवसेना उबाठा गटाचे सध्याचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी मिळाल्याचे जाहीर केल्यानंतर पक्षातील घरचा आहेर दानवे स्वरुपात त्यांना मिळाला आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगरच्या लोकसभेच्या जागेवर आपल हक्क सांगितला आहे.असे असले तरीही निकाल अजून प्रतीक्षेत आहे.त्यामुळे खैरे यांनाहि उमेदवारी दिल्या जाऊ शकते हि शक्यता नाकारता येत नाही.
याशिवाय विनोद पाटील आणि डॉ जीवन राजपूत हे सुद्धा चर्चेत आहेत
महायुती पक्षाकडून विनोद पाटील यांना उमेदवारी दिली जाऊ शकते याची शक्यता नाकारता येत नाही त्यातच मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्याशी विनोद पाटील हे कायम जवळीक साधून आहे .मराठा समाजाची मते वळविण्यासाठी विनोद पाटील हे ब्रम्हास्त्र आहे असे त्यांना वाटते त्यामुळे पाटील हे रिंगणात उतरतील यात शंका नाही .
यासोबत डॉ जीवन राजपूत हे सुद्धा सपोर्ट जे आर ची मोहीम राबवत आहेत त्यामुळे त्यांची सुद्धा लोकसभा लढण्याची इच्छा आहे मात्र पक्ष कुठला कि अपक्ष लढणार हे वेळच सांगेल.