MH Bindass समूहाबद्दल थोडक्यात संक्षिप्त
समूह स्थापना:
1 जानेवारी 2019 रोजी डिजीटल प्रसारमाध्यमांच्या दुनियेत MH Bindass चे संस्थापक व कोअर कमिटी सदस्यांनी बिंदास समूह स्थापनेचा निर्णय घेतला.
सुरूवात अधिकृत संकेतस्थळ आणि डिजीटल समाजमाध्यमांपासून करण्यात आली. यावेळी अधिकृत संकेतस्थळ म्हणून
www.mhbindass.com
ची अधिकृत घोषणा करण्यात आली.
ऊद्देश:
प्रस्थापित माध्यमांच्या दुनियेत जनसामान्यांचे महत्वपुर्ण विषय कायमच प्रलंबित राहतात.म्हणून गोर गरीब ,अन्यायाने ग्रासलेल्या कष्टकरी,कामगार मजूरांच्या व्यथा मांडता याव्यात याकरीता हक्काचे प्रसारमाध्यम मिळावे जनतेच्या हक्काचे व्यासपीठ जे जनसामान्यांचे न्यायास्ञ बनेल...!
समूह प्रमुख /संस्थापक
विवीध नामांकित दैनिकांत, नोंदणीकृत प्रक्षेपित नामांकित वृत्तवाहिन्यांमध्ये काम केल्यानंतर सर्वेसर्वा श्री प्रविण पाटिल यांची ही मूळ संकल्पना आहे.यानंतर समूहाचे मुख्य MH Bindass, MH Food, MH Agro आणि MH Majha हे चैनल्स महाराष्ट्रासह, राज्याबाहेरही आपली ख्याती आणि कामाची व्याप्ती निर्माण करू लागले.
समूहाचे चैनल्स
MH BINDASS हे राज्यातील प्रमुख घडामोडी,इतिहाच्या पाऊलखुणा ,अध्यात्मिक संरचना ,संस्कृति राजकिय घडामोडींची निवडक माहिती, खेळातील स्वारस्य, यांसह गुन्हेगारी आणि वेगळेपण असलेले अपडेट दर्शवित असते.
MH Food
राज्यातील विवीध भागातील पर्यटन ,भ्रमंती करत असताना आपल्याला महत्वाचे वाटते ते म्हणजे जेवण ..त्यातही हे जेवण जर सगळ्याच बाबतीत वेगळेपण देणारे असेल तर ऊत्तमच नाही का ?
इथे तुम्हाला विवीध खाद्यपदार्थांची ,पेयाची, माहितीपुर्ण व्हिडीओज आणि माहितीपट वाचता येईल ,व्हिडीओज बघता येतील.
MH Agro
यातच पारंपारीक शेतील फाटा दिला जातोय,कधी संमिश्र पीकपद्धती पहायला मिळते तर कधी विवीध पीकांचे वेगवेगळे वाण आपल्याला पहायला मिळतातच!
पण हीच शेतीची माहिती थोडी हटक्या पद्धतीने जर आपल्याला करता आली तर, ही संकल्पना मनाशी धरून mh agro हे युट्यूब फेसबूक आणि www.mhbindass.com वर व्हिडीओसह वाचायलाही मिळेल.
ज्यात चांद्यापासून बांधापर्यंत माहिती असेल.
MH Majha
याशिवाय मंदिराची माहितीसुद्धा या चैनलवर आणि www.mhbindass.com वर वाचता येतील.
या समूहाला ऊच्चत्तम स्थळी म्हणजे यशाच्या ऊत्तुंग शिखरावर पोहचवीण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वच कोअर कमिटी सदस्यांसह बिंदासच्या चाहत्यांचे आभार
नेहमी काहितरी वेगळे देण्याचा प्रयत्न करू👏